राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार शालेय स्तरावर नव्याने बदल होताना दिसत आहेत. याची अंमलबजावणी राज्यात टप्याटप्प्याने केली जाणार आहे. नव्या धोरणानुसार आता राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना ‘सेतू अभ्यासक्रम ‘ बंधनकारक करण्यात येणार आहे. NCERT ने तयार केलेली पाठयपुस्तके आवश्यक राज्यस्तरीय बदलासह स्वीकारली जाणार आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडून निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नव्या धोरणाप्रमाणे शालेय शिक्षणाची रचना पूर्व माध्यमिक ते दुसरी , तिसरी ते पाचवी , माध्यमिक (सहावी ते आठवी ) उच्च माध्यमिक (नववी ते बारावी ) अशी करण्यात आली आहे. सेतू अभ्यासक्रम म्हणजे मागील वर्गातील महत्वाच्या संकल्पनांवर आधारित अभ्यासक्रम होय. त्यासाठी NCERT मार्फत तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. २०२८ – २९ पूर्वीच या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

NCERT राज्याच्या शैक्षणिक गरजानुसार पाठ्यक्रम तयार करत असून, नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीपूर्वी सेतू अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. पाठ्यपुस्तक तयार करताना विषयतज्ज्ञ व विभागप्रमुखांचा समावेश असणार आहे. हे सर्व पाठ्यपुस्तके अध्ययन निष्कर्षाची पूर्तता करणारी असावीत आणि त्यांची 3 पडताळणी एससीईआरटी करणार आहे. अंतिम मंजुरी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समन्वय समिती देणार असून, त्यानंतरच त्यांची अंमलबजावणी होणार आहे. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati