महाराष्ट्र राज्यसरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावं यासाठी एक नवीन संधी चालून आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता महिलांना १ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे आणि ते पण शून्य टक्के व्याजदराने लाडक्या बहिणींना अर्ज मिळणार आहे. हा कर्ज पुरवठा मुंबई बँक करत असून ५ ते १० महिला एकत्र येऊन लघुउद्योग सुरु करू शकतात.
मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये राज्यातील चार महामंडळांनी मिळून व्याजाची परतफेड करण्याचे ठरवले आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ , पर्यटन महामंडळाची ‘आई ‘ योजना , भटक्या – विमुक्त महामंडळ आणि ओबीसी महामंडळ, त्यामुळे लाभार्थी महिलांना प्रत्यक्षात कर्जावर कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.

मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कर्जासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित व्यवसायाची तपासणी केली जाईल. त्यानंतर 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होईल. सध्या मुंबई बँकेकडे 1 लाखांहून अधिक महिला सभासद आहेत, तर लाडकी बहीण योजनेत 12-13 लाख महिला सहभागी आहेत. या सर्व महिलांना आता शून्य व्याजदराचा लाभ मिळणार आहे. दरेकरांनी हेही स्पष्ट केले की, व्याजाची भरपाई मुंबई बँक शासनाच्या संबंधित महामंडळांकडून मिळवणार आहे. स्वयंपूर्ण विकासासाठी ही योजना टप्प्याटप्प्याने राज्यभर राबवली जाणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati