केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी १०वीत ‘बेसिक गणित’ (Basic Mathematics) विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांना एक विशेष सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या सूटीनुसार, अशा विद्यार्थ्यांना ११वीत गणित विषय घेण्याची परवानगी यंदाही मिळणार आहे. ही सूट मागील काही शैक्षणिक वर्षांपासून दिली जात असून या वर्षीही ती लागू राहणार आहे.
या संदर्भात CBSE ने शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत. पत्रात स्पष्ट नमूद आहे की, “ज्या विद्यार्थ्यांमध्ये ११वीत गणिताचा अभ्यास करण्याची क्षमता आणि योग्यता आहे, अशा विद्यार्थ्यांनाच हा विषय निवडण्याची परवानगी द्यावी.”

मात्र CBSE ने हे देखील स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय शालेय शिक्षण अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF-SE) आधारित नवीन अभ्यास योजना लागू झाल्यानंतर ही सूट लागू राहणार नाही.
याशिवाय बोर्डाने शाळांना सूचना दिल्या आहेत की, २०२५ च्या बोर्ड परीक्षेसाठी उमेदवारांची यादी (List of Candidates -LOC) एकदा पाठवण्यात आल्यावर त्यामध्ये विषय बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. शाळांनी ही माहिती पालक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून योग्य निर्णय घेता येईल.
सध्या अस्तित्वात असलेल्या CBSE नियमांनुसार, फक्त ‘स्टँडर्ड मॅथ्स’ निवडलेल्या विद्यार्थ्यांनाच ११वीत गणित विषय घेता येतो, तर ‘बेसिक मॅथ्स’ निवडलेल्यांना केवळ उपयोजित गणित (Applied Mathematics) घेण्याची मुभा आहे. कोविड काळानंतर पहिल्यांदा सीबीएसईने या नियमात लवचिकता आणली होती, आणि ती लवचिकता गेल्या तीन शैक्षणिक सत्रांपासून कायम आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati