वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सुवर्णसंधी !! डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक भरती सुरु ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या जाहिरातीत विद्यापीठ अनुदान आयोगाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या ६ ऑक्टोबरच्या अध्यादेशानुसार मुदतवाढ देऊन पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असल्याचा उल्लेख त्यात केला आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. ती नीट काळजीपूर्वक वाचा.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

BAMU Bharti 2025

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने (Department of Higher Education) 6 ऑक्टोबर 2025 रोजी विद्यापीठातील विभागांमधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरती (Recruitment for vacant posts of professors)प्रक्रियेसंदर्भातील नवीन नियमावली प्रसिद्ध केली. त्यानुसार आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University)विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचा कोणताही उल्लेख या जाहिरातील करण्यात आलेला नाही तर राज्य शासनाच्या 6 ऑक्टोबरच्या अध्यादेशानुसार मुदतवाढ देऊन पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असल्याचा उल्लेख त्यात केला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 53 असिस्टंट प्रोफेसर, 12 असोसिएट प्रोफेसर आणि 8 प्रोफेसर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 4 अधिष्ठाता, 1 सब कॅम्पस डिरेक्टर, 1 इनोवेशन इंक्युबॅशन अँड लिंकेजेस डिरेक्टर,1 लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेंशन डिरेक्टर, 1 नॉलेज रिसोर्स सेंटर डिरेक्टर या पदासाठी सुद्धा अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांना 24 नोव्हेंबरपर्यंत अर्जाची हार्ड कॉपी विद्यापीठात जमा करावी लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठातील प्राध्यापक भरती संदर्भात राज्यपाल कार्यालयातर्फे पारदर्शक पदभरतीसाठी नवीन नियमावली तयार केली जात असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध झाला. त्यानुसार आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नियमावली बाबत प्राध्यापक संघटनांनी काही आक्षेप नोंदविले आहेत. मात्र, त्याचा कोणताही विचार झालेला नाही. नव्या नियमावलीनुसार जर काही विषयांना अर्ज कमी आले तर नियमावली बदलाबाबत विचार केला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आणखी महिन्याभरानंतर प्राध्यापक भरती बाबत काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

All teachers TET Exam Compulsary 2025

महत्वाची बातमी !! सर्व शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक; त्यासाठी फेरविचार याचिका नको !

सर्व शिक्षकांसाठी महत्वाची बातमी , सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषद आणि शाळांमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *