वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर !! SSC अंतर्गत GD Constable च्या तब्बल २५ हजार ४८७ रिक्त जागेची भरती सुरु ; अर्ज कसा करावा जाणून घ्या

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत GD कॉन्स्टेबल पदाच्या २५ हजार ४८७ रिक्त जागेची भरती जाहीर केलेली आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. संपूर्ण माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

SSC GD Constable Bharti for 25486 posts 2025

स्टाफ सिलेक्शन कमिशनने जीडी कॉन्स्टेबलच्या (Staff Selection Commission Recruitment for GD Constable) पदांसाठी बंपर भरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), इंडो-तिबेटी सीमा पोलिस (ITBP), सशस्त्र सीमा बल, आसाम रायफल्स (AR) आणि सचिवालय सुरक्षा दल (SSB) मध्ये एकूण २५ हजार ४८७ रिक्त जागा (25 thousand 487 vacancies) भरल्या जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत (Deadline is December 31, 2025) देण्यात आली आहे.

एसएससी व्दारे अधिसूचना अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि रिक्त जागांची तपशीलवार माहिती तपासू शकतात. हि जाहिरात म्हणजे १० वी पास उमेदवारांना एक सुवर्णसंधीच राहील. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप शारीरिक चाचणी माहिती येथे तपासा

सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल, तर महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) यांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे. SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025 च्या भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित परीक्षा (CBE) घेण्यात येईल. ही परीक्षा मल्टिपल चॉइस प्रश्नांसह असेल. शारीरिक मापदंड चाचणी (PST) मध्ये उमेदवाराची उंची, छाती, वजन यांचे मापदंड तपासले जातील. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) मध्ये धावणे, उंच उडी, लांब उडी अशा कार्यक्षमतेच्या चाचण्या घेतल्या जातील. वैद्यकीय तपासणी (DME/RME)मध्ये आरोग्य चाचण्या घेतल्या जातील. कागदपत्र पडताळणी मध्ये उमेदवारांच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ICT मुंबई – प्रकल्प सहाय्यक पदावर नोकरीची संधी

ICT Mumbai RGSTC PA Job 2026 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *