SSC MTS कर्मचारी निवड आयोगाअंतर्गत विविध पदांसाठी भरती,अर्ज कसा करायचा ?
SSC MTS Job Vacancy 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे देशांत भरती जाहीर करण्यात आली आहे . स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे मल्टी टास्किंग स्टाफसाठी पदभरती केली जाणार आहे.
कर्मचारी निवड आयोगामध्ये भरती सुरु आहे . सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी या नोकरीसाठी नक्की अर्ज करा .स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे मल्टी टास्किंग व हवालदार पदासाठी भरती सुरु आहे. जवळपास ८३२६ पदांसाठी ही भरती सुरु आहे. सिलेक्शन कमिशन मधील या नोकरीसाठी १० वी आणो १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे . मल्टी टास्किंग स्टाफ या पोस्टसाठी भरती केली जाणार आहे. १८ ते २७ वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात . अर्ज करण्यासाठी तुम्हाला १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. रिक्त पदांचा नेमका तपशिल https://ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati