शालेय विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून मागील अनेक दशकांपासून आयोजित केली जाणारी शासकीय रेखाकला परीक्षा (State Drawing Examination) (एलिमेंटरी ग्रेड व इंटरमीजिएट ग्रेड) (Elementary Grade and Intermediate Grade) यासाठी शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील आठ ते दहा लाख विद्यार्थी बसतात. मात्र, आता कला संचालनालयाने (Art Directorate) परीक्षा शुल्क वाढीच्या (Examination fee increase) घेतलेल्या निर्णयामुळे पालकांच्या खिशाला कात्री (Financial hardship for parents) लागणार आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
या शुल्कवाढीची जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांना आर्थिक झळ बसणार असल्याने कलाप्रेमींसह पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कला संचालनालयाने १८ जुलै २०२५ रोजी निर्गमित केलेले परिपत्रक रद्द करून एलिमेंटरीसाठी ५० रुपये व इंटरमिजिएटसाठी १०० रुपये या जुन्या दरानुसारच परीक्षा आयोजित करावी, अशी मागणी कलाप्रेमी व पालकांकडून होत आहे. आतापर्यंत एलिमेंटरी ग्रेडसाठी ५० रुपये आणि इंटरमिजिएट ग्रेडसाठी १०० रुपये शुल्क होते; परंतु शैक्षणिक वर्ष २०२५ पासून हे अनुक्रमे १०० व २०० रुपये करण्यात आले आहे. कला संचालनालयाच्या निर्णयानंतर विद्यार्थी, पालक, केंद्र संचालक आणि कलाविश्वाशी संबंधित मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे.
रेखाकला परीक्षेच्या माध्यमातून केवळ चित्रकलेतून उदयोन्मुख कलावंत घडत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये भारतीय कला, परंपरा आणि संस्कृतीबाबत जिव्हाळा निर्माण होतो. या परीक्षेत बहुसंख्येने शेतकरी, शेतमजूर, मोलमजुरी करणारे व दुर्बल कुटुंबातील मुले सहभागी होतात.
आधीच रंग साहित्याचे वाढलेले दर, केंद्रावर जाण्यासाठीचा प्रवासखर्च आणि इतर गरजांची तजवीज हे खर्च झेपावणे कठीण झालेले असताना आता शुल्क वाढीने परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी इच्छुक असूनही परीक्षेला बसू शकणार नाहीत, अशी भीती कलाप्रेमींसह पालकांना आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE