वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण मध्ये ३०० विविध रिक्त पदांची भरती सुरु ! जाणून घ्या सविस्तर

नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत ३०० रिक्त पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०२५ ही आहे. अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट वर भेट द्या. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Mahavitaran Recruitment 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (State Electricity Distribution Company Recruitment) लिमिटेड अंतर्गत “अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक” पदाच्या 300 रिक्त जागा (Recruitment process for 300 posts has started) भरण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 (Deadline December 22, 2025) आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in वर जावे लागणार आहे.

या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 300 पदे भरण्यात येणार आहेत. पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या पदांमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदांच्या 94 जागा, अतिरिक्त कार्यकारी अभियंताच्या 5 जागा, उपकार्यकारी अभियंता पदांच्या 69 जागा, उपकार्यकारी अभियंता (सिव्हील) पदांच्या 12 जागा, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या 13 जागा, व्यवस्थापक पदांच्या 25 जागा आणि उपव्यवस्थापक पदांच्या 82 अशा एकूण 300 जागा आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 आहे.

परीक्षाची तारीख नंतर कळवण्यात येईल, असे जाहिरातीत म्हटले आहे. अर्ज करणाऱया उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता बीई, बीटेक (इलेक्ट्रिक) आणि सिव्हील तसेच 7 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ऑनलाइन अर्जासोबत 500 रुपये प्लस जीएसटी आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 250 रुपये प्लस जीएसटी भरावे लागणार आहे.

भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in वर देण्यात आली आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

इंजीनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) येथे विविध पदांची भरती जाहीर – त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!

EIL Recruitment 2026 EIL Job Recruitment 2026 – EIL (Engineers India Limited) invites Online applications …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *