सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा लाभ ; त्यांना शेतीला पाईप लाईन चे अनुदान मिळणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ! पाईपलाईन अनुदान योजना २०२५ साठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरु झाले आहेत. जर तुम्ही शेतकरी असाल आणि सिंचनासाठी पाईपलाईन लावण्याचा विचार करत असाल, तर ही योजना तुम्हाला सरकारी अनुदानाच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळेल. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
शेतकऱ्यांना प्रवर्गानुसार अनुदान दिलं जातं
OBC व OPEN प्रवर्गासाठी:
PVC पाइप – ₹35 प्रति मीटर
HDP पाइप – ₹50 प्रति मीटर
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा – ₹15,000 (428 मीटरपर्यंत)
SC/ST प्रवर्गासाठी: 100%
अनुदान जास्तीत जास्त अनुदान – ₹30,000 पर्यंत
अर्ज प्रक्रिया
- महाडीबीटी पोर्टल लॉगिन करा
- https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा
- “Farmer Login” वर क्लिक करा Farmer ID टाका आणि
- लॉगिन करा जर ID माहीत नसेल, तर आधार नंबर टाकून नवीन ID मिळवा
- प्रोफाइल 100% पूर्ण करा
- सर्व आवश्यक माहिती भरा
- बँक डिटेल्स, जमीन माहिती, आधार व इतर कागदपत्रे अपडेट करा
- नवीन घटकासाठी अर्ज करा “सिंचन साधने व सुविधा” हा पर्याय निवडा यामध्ये Pipe (पाईप) हा पर्याय दिसेल PVC किंवा HDP Pipe निवडा
- मीटर निवड तुम्ही 60 मीटरपासून 428 मीटरपर्यंत अर्ज करू शकता शक्यतो 428 मीटर निवडल्यास जास्तीत जास्त अनुदान मिळू शकते
- पूर्वसंमती व अर्ज सबमिट “मी पूर्वसंमतीशिवाय पाइप खरेदी करणार नाही” या पर्यायावर
- क्लिक करा “बाब जतन करा” आणि “अर्ज सबमिट करा” वर क्लिक करा अर्ज सादर केल्यानंतर ₹23.60 चे पेमेंट ऑनलाइन करा
पाईपलाईन अनुदान योजना 2025 शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त योजना आहे, जी सिंचनाच्या खर्चात बचत करते आणि शेती अधिक सुलभ करते. जर तुम्ही अजून अर्ज केलेला नसेल, तर आजच महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा आणि वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुमचा अर्ज सादर करा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE