JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

‘वाल्मी’च्या समोर परीक्षार्थीचा आक्रोश, पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याची मागणी

The question paper has been released before the recruitment exam for 670 posts of Water Conservation Officer Group B (Non-Gazetted) of Soil and Water Conservation Department. Crimes have been registered against the malpractices in this recruitment, and the examinees staged a protest on Wednesday morning at the entrance of the Valmi Institute to demand that the examination be canceled and the examination conducted again.

The process of recruitment of 670 posts in the cadre of Water Conservation Officer Group-B in the Water Conservation and Zilla Parishad system under the Soil and Water Conservation Department was recently implemented. For this, the exam was conducted online on February 20 and 21 at various designated centers.

मृदा व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) पदाची ६७० जागांच्या भरतीच्या परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर आलेली आहे. या भरतीत गैरव्यवहार करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून, घेतलेली परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी परीक्षार्थीनी वाल्मी संस्थेच्या प्रवेशद्वारावर बुधवारी सकाळी जोरदार आंदोलन केले. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषदे यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी गट-ब या संवर्गातील ६७० पद भरतीबाबतची प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली. त्यासाठी २० व २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने निश्चित केलेल्या विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

त्यात २१ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आला होता. त्याशिवाय इतर ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवरही गैरप्रकार झाल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला आहे. त्यामुळे झालेली परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याच्या मागण्यासाठी वाल्मीच्या समोर बुधवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. पूजा मोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी परीक्षार्थीनी हातात फलक घेऊन निषेध नोंदवित पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. निदर्शनानंतर मागण्याचे निवेदन वाल्मी प्रशासनाला देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *