JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

तरुणांसाठी मोठी संधी! TATA कंपनीत नोकरी मिळवण्याची वेळ; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या !

तरुणांसाठी मोठी संधी! TATA कंपनीत नोकरी मिळवण्याची वेळ; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या !

Tata Technologies Recruitment 2025 : टाटा टेक्नॉलॉजीने ऑटोमोटिव्ह लँडस्केपमध्ये क्रांती घडवण्यासाठी १०० हून अधिक क्लाउड आणि डेटा इंजिनियर्सची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

TATA Technologies Recruitment 2025

चांगल्या आणि प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेकांच्या मनात असते, आणि टाटा ग्रुप ही अशी कंपनी आहे जिथे काम करण्याची इच्छा असते. सध्या टाटा ग्रुप विविध क्षेत्रात आपली छाप सोडत आहे. याच दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीने ऑटोमोटिव्ह लँडस्केपमधील बदलांसाठी १०० हून अधिक क्लाउड आणि डेटा इंजिनियर्सची नियुक्ती करण्यासाठी एक भरती मोहीम सुरू केली आहे. या संस्थेने घोषणा केली आहे की, भविष्यात सॉफ्टवेअर-परिभाषित वाहन सोल्यूशन्सच्या नाविन्यपूर्णतेसाठी इच्छूक उमेदवारांना संधी दिली जाईल. निवडलेले उमेदवार उत्साही वातावरणात काम करतील आणि सॉफ्टवेअर-परिभाषित वाहनांवर काम करण्याचा अनुभव घेतील.

कंपनी किमान पाच वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार शोधत आहे. उपलब्ध असलेल्या पदांमध्ये क्लाउड इंजिनियर, डेटा इंजिनियर, सोल्यूशन आर्किटेक्ट, तसेच इतर पदांचा समावेश आहे. या सर्व पदांसाठी विशिष्ट तांत्रिक अनुभव आवश्यक आहे, जो क्लाउड इंजिनिअरिंग, डेटा इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये असेल.

ही पदे पुणे, चेन्नई आणि बेंगळुरू येथील आहेत. इच्छुक उमेदवार टाटा टेक्नॉलॉजीजच्या अधिकृत करिअर पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट tatatechnologies.com/in/hiring-drive ला भेट द्यावी.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *