वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ !

The deadline for publishing advertisements on the Pavittra portal has been extended until March 31 : शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बर्‍याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यासाठी अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यामुळे दुसर्‍या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी मोठ्या प्रमाणात पदे उपलब्ध होणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीच्या दुसर्‍या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीसाठी २० जानेवारीपासून पोर्टलवर आणि सर्व व्यवस्थापनांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यापूर्वी १ हजार २१६ व्यवस्थापन आणि विविध माध्यमांसाठी १ हजार ३३७ जाहिरातींची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

Pavitra Portal

शिक्षण विभागाने २० जानेवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जाहिरातीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती, पण बर्‍याच व्यवस्थापनांना अजून काही अधिक कालावधीची आवश्यकता असल्याने, आता पुन्हा पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना शिक्षण विभागाने आवाहन केले आहे की, आपल्या अधीनस्त शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी.

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

AIIA Bharti 2025 अंतर्गत विविध पदांची भरती सुरू !

AIIA Bharti 2025 ! Intersted Candidate should submit application format given addresss below before last date.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *