The dear sisters will receive ₹3000 : ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. गेल्या वर्षी जुलैपासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण 9 हाफ्ते जमा करण्यात आले आहेत.
तथापि, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून घोषणा करण्यात आली होती की, जर सरकार आले तर लाडकी बहीण योजनेतील महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये दिले जातील. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि ती राज्यात पुन्हा सत्तेत आली, पण या योजनेतील लाभार्थींना अजूनही 1500 रुपयेच दिले जात आहेत. महिलांना 2100 रुपये कधी मिळणार, याबाबत राज्याचे लक्ष लागले आहे.
तथापि, अर्थमंत्री अजित पवार यांनी सूचित केले आहे की, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावरच 2100 रुपये दिले जातील. त्याआधारे, भाजप नेते परिणय फुके यांनी या योजनेवर प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, “लाडकी बहीण योजना सुरूच राहील आणि यासाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 2100 रुपये काय, आम्ही 3000 रुपये देणार, पण थोडा वेळ थांबावा लागेल. आम्ही महिलांच्या विश्वासाला योग्य उत्तर देणार आहोत. 1500 रुपये सुरू ठेवले जातील आणि जसजशी राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल, तसतशे 2100 रुपये देण्यात येतील, आणि आणखी सुधारले तर 3000 रुपये देऊ,” असं ते म्हणाले.
आता महिलांना वाढीव रक्कम कधी मिळेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE