महावितरण विद्युत सहाय्यक पदभरती 2025 : परीक्षा तारिख व प्रवेशपत्र जाहीर ! गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran / MSEDCL) मार्फत विद्युत सहाय्यक पदासाठी होणाऱ्या परीक्षेच्या अधिकृत तारखा आणि प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहेत.
Mahavitaran ताज्या अधिसूचनेनुसार, विद्युत सहाय्यक पदांची परीक्षा २० मे ते २२ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले असून, उमेदवारांनी ते डाउनलोड करून ठेवणे अत्यावश्यक आहे.
ही भरती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून, एकूण ५,३४७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विशेष मागासवर्ग (VJ-A), विविध NT वर्ग (B, C, D), इतर मागासवर्गीय (OBC), विशेष मागासवर्गीय (SBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS) आणि खुल्या प्रवर्गासाठी आरक्षणाचा समावेश आहे.
याशिवाय महिला, माजी सैनिक, दिव्यांग, कुष्ठरोगमुक्त, बुटकेपणा आणि अॅसिड हल्ला पीडितांसाठीही आरक्षित जागा उपलब्ध आहेत, ज्यामुळे ही भरती सर्वसमावेशक ठरणार आहे.
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
Mahavitaran ची अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in ला भेट द्या.
तुमचा नोंदणीकृत User ID आणि Password वापरून लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर “Admit Card” लिंकवर क्लिक करा.
प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट घेणे विसरू नका.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE