आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना जून चा हफ्ता मिळायला सुरुवात झालेली आहे. ही माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ३० जून २०२५ रोजी लाडक्या बहिणीच्या जून महिन्याच्या हफ्त्यासाठी सरकारकडून ३६०० कोटी रुपये निधी वितरणास मान्यता देण्यात आली होती. प्रत्यक्षात लाडक्या बहिणीच्या खात्यात हा निधी जमा झालेला नव्हता . जून महिन्याचा हफ्ता कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता आदिती तटकरे यांनी माहिती दिली की, ४ जुलै पासून या योजनेचा जून महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करायला सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींसाठी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया मधून एक मोठी गुड न्यूज दिली आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला होता.
या बद्दल माहिती ही स्वतः राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे.
योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब
माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा विश्वास आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE