मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या बाराव्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आला आहे – हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? जर आपण या योजनेचे लाभार्थी असाल, तर आजची बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अलीकडील हप्त्यांची माहिती महिलांच्या खात्यात नुकताच मे महिन्याचा ११वा हप्ता जमा झाला आहे, जो जूनच्या सुरुवातीला ट्रान्सफर करण्यात आला.
त्याआधी, एप्रिल महिन्याचा १०वा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला होता. यामुळे आता महिला जून महिन्याच्या १२व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मिडिया रिपोर्ट व वास्तव याआधी काही मिडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की मे व जून महिन्याचे (११वा आणि १२वा हप्ता) पैसे एकत्रितपणे, वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र प्रत्यक्षात फक्त ११व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. बारावा हप्ता कधी जमा होणार?
नवीन माहितीनुसार, जून महिन्याचा १२वा हप्ता १५ ते २० जून २०२५ दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जून महिना संपण्यापूर्वीच हा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. मात्र, यासंदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही,
त्यामुळे हप्ता जूनमध्ये जमा होतो की जुलैमध्ये, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. योजनेबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० दिले जातात. ही योजना जुलै २०२४ पासून सुरू झाली असून आतापर्यंत महिलांना ११ हप्ते मिळाले आहेत — जुलै २०२४ ते मे २०२५
या कालावधीतील. पात्रता निकष वय २१ ते ६५ वर्षांदरम्यान असावे अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा निराधार महिला लाभार्थी असू शकतात वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावे आधीपासून इतर कोणत्याही वैयक्तिक
शासकीय योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना वगळण्यात आले आहे ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांनाही लाभ दिला जाणार नाही
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

