वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी !! या दिवशी मिळणार जूनचा हफ्ता,आणि सोबतच मिळणार लोन ; समोर आली नवीन माहिती !

माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हफ्ता कधी मिळणार या बाबत नवीन अपडेट आली आहे.

सध्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या योजनेच्या पुढील हफ्त्याची वाट बघत आहे. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हफ्ता म्हणजेच बारावा हफ्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतो? या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.

New Update for ladki Bahin Yojana June Installnment 2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मागच्या २०२४ यावर्षी सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रूपये दिले जात आहे. जुलै २०२४  पासून महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर , ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर २०२४ आणि जानेवारी , फेब्रुवारी , मार्च ,एप्रिल , मे २०२५ या कालावधी मधील ऐकूण ११ हफ्ते जमा करण्यात आले आहेत.

मे महिन्याचा हफ्ता हा नुकत्याच काही दिवसापूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मे महिन्याचा लाभ जून महिन्याच्या सुरुवातीला पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला असून आता या योजनेच्या लाभार्थी महिलांकडून जून महिन्याच्या हफ्त्याची विचारणा केली जात आहे.

खरतर मे महिन्याचा लाभ जून महिन्यात मिळाला असल्याने जून महिन्याचा हफ्ता कधी मिळणार हा मोठा सवाल आहे. जून महिन्याचा हफ्ता जून महिन्यातच मिळणार की जुलै महिन्यात असा प्रश्न लाडक्या बहिणीकडून उपस्थित होतोय.

जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता दिला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. पण या संदर्भातील अधिकृत माहिती अजूनही हाती आलेली नाही यामुळे जून महिन्याचा लाभ हा या महिन्याचा शेवटी मिळतो की जुलै महिन्यात दिला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पंधराशे रुपये जमा होणार की 2100 खरेतर, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ देव असे म्हटले होते. मात्र महायुतीचे सरकार स्थापित होऊन आता बरेच दिवस झाले आहेत तरीही या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही.

पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील, असं सांगण्यात येत आहे. जून महिना संपायला अवघे 8 दिवस उरलेले आहेत. म्हणून आता या शेवटच्या दिवसांत कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात असा दावा केला जात आहे. पण 2100 रुपयांसाठी लाडक्या बहिणींना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MPKV COA पुणे – रु. ५०,०००/- दरमहा वेतन ; १ वैदयकीय पदभरती जाहीर

MPKV COA Pune MO Job 2025 - Associate Dean, College of Agriculture, Pune invites Offline applications in prescribed.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *