वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

तुमच्या आवडीचा BSNL मोबाईल नंबर निवडण्यासाठी ; या स्टेप्स फॉलो करा !

तुमच्या आवडीचा BSNL मोबाईल नंबर निवडण्यासाठी ; या स्टेप्स फॉलो करा !

To select your preferred BSNL mobile number; Follow these steps! :

Jio, Airtel आणि Vodafone या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्यानंतर सर्वसामान्य ग्राहक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी अनेक ग्राहकांनी देशी टेलिकॉम कंपनी BSNL ची वाट धरली आहे. मागील महिन्यापासून अनेक ग्राहकांनी नवीन बीएसएनएलचे सिमकार्ड खरेदी केलं आहे तर काही जणांनी आपलं Jio, Airtel आणि Vodafone चे सिमकार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट केलं आहे. बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन हे तुलनेनं खूपच स्वस्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलंच परवडत आहे. यामुळेच कंपनी देशभरात आपल्या सेवांचा विस्तार करत आहे आणि विशेषतः 4G सेवांचे नेटवर्क वाढवत आहे.

अशावेळी जर तुम्ही सुद्धा रिचार्जच्या वाढत्या किमतीने वैतागून BSNL चे नवीन सिमकार्ड घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी अतिशय उपयुक्त आहे. कारण कंपनी आता आपल्याला हवा तो आवडीचा मोबाईल नंबर निवडण्याची संधी देत आहे. म्हणजेच तुम्हाला जो मोबाईल नंबर हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला तर याबाबत आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देतो.

  • सर्वात आधी तुम्हाला Google वर जाऊन ‘BSNL Choose Your Mobile Number’ वर जावे लागेल.
    यानंतर ‘cymn’ लिंकवर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला तुमचा झोन निवडावा लागेल.म्हणजेच तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता किंवा तुमचा झोन कोणता ते टाका.
  • आता ‘Fancy Number’ वर क्लिक करा आणि तुमच्या आवडीचा मोबाईल क्रमांक निवडा.
  • पसंतीच्या क्रमांकानंतर तुम्हाला ‘रिझर्व्ह नंबर’चा पर्यायही दिला जातो. तुम्ही हा पर्याय सुद्धा निवडू शकता.
  • आता तुमचा सध्याचा नंबर टाकून OTP मिळवा आणि त्याठिकाणी टाका
  • पसंतीचा क्रमांक निवडल्यानंतर, तुम्हाला सिम घेण्यासाठी बीएसएनएल स्टोअरमध्ये जावे लागेल.

दरम्यान, टाटा समूहाची आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसने BSNL सोबत 1500 कोटी रुपयांचा 4G नेटवर्कचा करार केलेला आहे. या करारा अंतर्गत TCS आणि BSNL या दोन कंपन्या मिळून 4G नेटवर्क सर्विस 1000 गावापर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना सुद्धा फास्ट इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे. टाटा आणि BSNL यांच्या करारामुळे BSNL ची 4G इंटरनेट सेवा आणखी मजबूत होणार आहे. आतापर्यंत Jio आणि Airtel सारख्या दूरसंचार कंपन्यांचे 4G नेटवर्कवर वर्चस्व होते, परंतु BSNL च्या या करारामुळे जिओ आणि एअरटेलच टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत.

About Majhi Naukri

Check Also

UMC उल्हासनगर NUHM/15th FC/HBT/PC अंतर्गत ८२ वैदयकीय पदभरती जाहीर

UMC NUHM/15th FC/HBT/PC Recruitment 2025 - Deputy Commissioner (Medical Health Department), Ulhasnagar Municipal....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *