Today declared 12th class Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या (१२वी) परीक्षेचा निकाल आज, सोमवार ५ मे २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे.

राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतिक्षेचा अंत होत असून, निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org आणि www.results.gov.in या वेबसाइट्सवर आपला निकाल पाहू शकतात.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव तयार ठेवणे आवश्यक आहे.
महत्वाचे लिंकस:
👉 mahresult.nic.in
👉 hscresult.mkcl.org
👉 results.gov.in
राज्यभरातून निकालाची टक्केवारी आणि टॉपर विद्यार्थ्यांची माहिती निकालानंतर काही वेळात जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अफवांपासून दूर राहून फक्त अधिकृत संकेतस्थळांवरच माहिती पाहावी, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati