Todays Gold Rate 11th March 2025 : सोनं हे प्राचीन काळापासून संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जात आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याचे अत्यंत महत्त्व आहे. लग्नसोहळे, सण-उत्सव किंवा इतर विशेष प्रसंगी सोन्याची खरेदी शुभ मानली जाते.
सोनं केवळ दागिन्यांसाठीच नाही, तर आर्थिक सुरक्षिततेसाठी देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे सोनं ही फक्त शोभेची वस्तू नसून, ती भविष्यकाळातील एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील ओळखली जाते.

गुंतवणुकीच्या दृषटिकोनातून पाहता, सोनं नेहमीच एक सुरक्षित पर्याय म्हणून राहिले आहे. शेअर बाजारातील चढ-उतार किंवा जागतिक आर्थिक स्थितीतील बदलांचा त्यावर फारसा प्रभाव पडत नाही. यामुळे, दीर्घकालीन फायद्यासाठी गुंतवणूकदार
सोन्याकडे आकर्षित होतात. विशेषतः चलनवाढीच्या काळात सोन्याचे दर स्थिर राहतात किंवा वाढतात, म्हणूनच ते एक सुरक्षित आश्रयस्थळ मानले जाते.
सोने वधारले :
गेल्या आठवड्यात सोमवारी 760 रुपयांनी तर मंगळवारी 600 रुपयांनी सोने महागले होते. त्यानंतर त्यात सतत घसरण दिसून आली. पण सोने 110 रुपयांनी वाढले आहे. आज सकाळच्या सत्रातही महागाईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, सध्या 22 कॅरट सोने 80,065 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरट सोने 87,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati