UGC NET Exam Result Declared : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने डिसेंबर 2024 मध्ये घेतलेल्या CSIR UGC NET परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट csirnet.nta.ac.in वर जाऊन आपले स्कोअरकार्ड पाहू शकतात.
निकाल पाहण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक आहे. जे उमेदवार निर्धारित किमान कटऑफ गुण मिळवतात, त्यांना ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्र मानले जाते. अशा पात्र उमेदवारांना NTA कडून पात्रता प्रमाणपत्र आणि JRF प्रमाणपत्र दिले जाईल.
ही परीक्षा 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 या कालावधीत पार पडली होती. देशभरातील 164 शहरांमध्ये 326 परीक्षा केंद्रांवर एकूण 2,38,451 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. CSIR NET परीक्षा दोन सत्रांमध्ये झाली होती – पहिला सत्र सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरा सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान पार पडला. परीक्षेनंतर, NTA ने 11 मार्च 2025 रोजी तात्पुरती उत्तर की जाहीर केली होती. उत्तर कीमध्ये काही चुका असल्यास त्यावर उमेदवारांना 14 मार्च 2025 पर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली होती. या प्रक्रियेनंतर अंतिम उत्तर कीच्या आधारे निकाल तयार करण्यात आला.
निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी csirnet.nta.ac.in या वेबसाइटला भेट द्यावी, “CSIR UGC NET December 2024 Result” या लिंकवर क्लिक करावे, त्यानंतर आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करावे. स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करून भविष्यासाठी सुरक्षित ठेवावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE