वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना अंतर्गत १०वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना अडीच हजार शिष्यवृत्ती मिळणार ! लवकर अर्ज करा !

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना , ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे.  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास मंडळातर्फे मातंग समाजातील गुणवत्ताधारक गरजू  विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभ्यासक्रमामध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या  विद्यार्थ्यांची निवड या योजनेसाठी केली जाते. या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. समाजातील होतकरू विद्यार्थी आणि आर्थिकद्रुष्ट्या दुर्बल विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये , हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा लाभ एकदाच मिळतो.

Sahityaratna Lokshashir Anna Bhau Sathe Scolarship Yojana 2025

कोणाला लाभ घेता येतो 

मातंग समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो . विद्यार्थ्यांना ६०% गुण घेणे आवश्यक आहे. महाविद्यालये विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५  लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी भारतीय नागरिक असावा.

कोणाला किती शिष्यवृत्ती मिळणार 

दहावी : १  हजार रुपये

बारावी : १५०० रुपये

पदवी : २०००  रुपये

अभियांत्रिकी व वैद्यकीय : २५०० रुपये

महत्वाची कागदपत्रे  

अर्ज करताना जातीचा दाखला , उत्पन्नाचा दाखला , रेशन कार्ड , मागील अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका ही कागदपत्रे लागतात.

अर्ज कोठे करायचा ?

अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकासमंडळ येथे करावा.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ (MSBB), नागपूर अंतर्गत “या” पदाची भरती जाहीर; थेट अर्ज करा !!

Maharashtra State Biodiversity Board Recruitment 2025 Job Recruitment 2025 – Maharashtra State Biodiversity Board, Nagpur …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *