केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (Union Public Service Commission) २२ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२५ चा निकाल (Civil Services Mains Exam 2025 Result)जाहीर करण्यात आला.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी नावांसह व रोल नंबरसह प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा (Indian Administrative Service, Indian Foreign Service, Indian Police Service)आणि इतर केंद्रीय सेवा (गट ‘अ’ आणि गट ‘ब’) मध्ये निवडीसाठी व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) साठी पात्र ठरले आहेत
निकाल जाहीर झालेल्या उमेदवारांची उमेदवारी ही तात्पुरती आहे. जर ते सर्व बाबतीत पात्र आढळले तर उमेदवारांना त्यांच्या पात्रता/आरक्षण दाव्यांच्या समर्थनार्थ मूळ प्रमाणपत्रे जसे की वय, शैक्षणिक पात्रता, समुदाय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, बेंचमार्क अपंगत्व (पीडब्ल्यूबीडी) असलेली व्यक्ती आणि टीए फॉर्म इत्यादी इतर कागदपत्रे त्यांच्या व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखती) च्या वेळी सादर करावी लागतील. त्यामुळे उमेदवारांनी संबंधित कागदपत्रे त्यांच्यासोबत तयार ठेवावी. ज्या उमेदवारांना SC/ST/OBC/EWS/PwBD/एक्स सर्व्हिसमन इत्यादींसाठी आरक्षण/सवलतीचे फायदे उपलब्ध आहेत, त्यांनी नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा, २०२५ च्या अर्जाच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच २१.०२.२०२५ रोजी जारी केलेले मूळ प्रमाणपत्रे देखील सादर करणे आवश्यक आहे.
या उमेदवारांच्या व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखती) च्या तारखा योग्य वेळी कळवल्या जातील. तसेच उमेदवारांच्या मुलाखती नवी दिल्ली येथील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात घेतल्या जातील. व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखती) वेळापत्रकानुसार उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवारांच्या व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखती) चे पत्र योग्य वेळी उपलब्ध करून देण्यात येतील. तयासाठी उमेदवारांनी https://www.upsc.gov.in आणि https://www.upsconline.gov.in आयोगाच्या वेबसाइटला भेट द्यावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati