UPSC NDA-2 (2024) Results Declared; 792 Candidates Selected Nationwide : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षा २ – २०२४ चा अंतिम निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे.
यामध्ये एकूण ७९२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी होण्यासाठी पुढे प्रवेश घेणार आहेत.
या परीक्षेतील गुणवत्ता यादीत इमॉन घोषने प्रथम क्रमांक पटकावला आहे, जो NDA NA परीक्षा २ – २०२४ मध्ये देशात अव्वल ठरला आहे.ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडली. लेखी परीक्षा १ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आली, त्यानंतर सेवा निवड मंडळाच्या (SSB) मार्फत मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये उमेदवारांचे शारीरिक, मानसिक, आणि बौद्धिक क्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले. यशस्वी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि SSB मुलाखतीच्या आधारे करण्यात आली असून वैद्यकीय चाचणीचा निकाल गुणवत्ता यादीत समाविष्ट केलेला नाही.
या परीक्षेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना आता राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या १५४व्या कोर्समध्ये, तसेच भारतीय नौदल अकादमीच्या ११६व्या कोर्समध्ये प्रवेश मिळणार आहे. या दोन्ही संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ते भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी म्हणून देशसेवेसाठी सज्ज होतील.
या निवड प्रक्रियेत फक्त शैक्षणिक पात्रता नाही, तर नेतृत्व, मानसिक स्थैर्य, आणि शिस्त या गुणांवर आधारित संपूर्ण मूल्यांकन करण्यात आले. उमेदवारांची तयारी आणि समर्पण या प्रक्रियेत प्रकर्षाने दिसून आली.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE