वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

प्रीती सुदान UPSC च्या नव्या अध्यक्षा !

प्रीती सुदान UPSC च्या नव्या अध्यक्षा !

upsc news chairperson : मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर प्रीती सुदान यांची युपीएससीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोक सेवा आयोग ही भारत संघ राज्याची निवड संस्था आहे

मनोज सोनी यांनी यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारने माजी आरोग्य सचिव प्रीती सुदान (Preeti Sudan) यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सध्या ‘यूपीएससी’च्या सदस्य असलेल्या सुदान गुरुवारी पदभार स्वीकारणार आहेत. ‘प्रीती सुदान एक ऑगस्टपासून पुढील आदेश येईपर्यंत किंवा २९ एप्रिल २०२५ पर्यंत या पदावर राहतील,’ असे आदेशात म्हटले आहे. आंध्र प्रदेश केडरच्या १९८३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या सुदान यांनी जुलै २०२० पर्यंत तीन वर्षे केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून काम केले आहे. मनोज सोनी यांचा राजीनामा ३१ जुलै रोजी मंजूर केला असून, त्यांनी ४ जुलै रोजी राजीनामा दिला होता.

केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोक सेवा आयोग ही भारत संघ राज्याची निवड संस्था आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या गट ‘अ’ व गट ‘ब’ कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे. हा आयोग ‘कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयातील’ (Ministry of Personnel , Public Grievances and Pensions) ‘कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग'( Department of Personnel and Training) ह्यांच्या अधिपत्याखाली येतो.

या संस्थेची सनद भारतीय राज्यघटना, भाग १४, अनुच्छेद ३१५-३२३ मध्ये दिलेली आहे. त्यास ‘संघ व राज्यातील सेवा’ असे नामकरण आहे. हा संवैधानिक आयोग आहे म्हणजेच, हा आयोग भारतीय संविधानातील तरतुदीनुसार स्थापन झाला आहे. भारत सरकार संघ सेवेतील(गट ‘अ’ व गट ‘ब’) तसेच अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या नेमणूक, बदली, पदोन्नती व शिस्तीची कारवाई इ. करिता लोक सेवा आयोगाशी सल्लामसलत करते. हा आयोग थेट राष्ट्रपतींना अहवाल सादर करतो. तसेच आयोग राष्ट्रपती मार्फत भारत सरकारला सल्ले देऊ शकते पण असे सल्ले बंधनकारक नसतात. संवैधानिक संस्था असल्याकारणाने केंद्रीय लोकसेवा आयोग हा भारतीय न्यायव्यवस्था व निवडणूक आयोग ह्याप्रमाणेच स्वायत्त आहे.

About Majhi Naukri

Check Also

नागपूर महानगरपालिका – आकर्षक वेतनावर १७४ गट-क संवर्ग पदभरती होणार ; नक्कीअर्ज करा !

NMC Nagpur Group-C Recruitment 2025 - Commissioner, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Online applications...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *