UPSC Recruitment2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) कडून सहाय्यक सरकारी वकील आणि इतर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १११ पदे भरली जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी १ मे २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी आणि दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. कारण वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
उमेदवारांनी https://upsconline.gov.in/ora/ या ORA पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. अर्ज प्रक्रियेमध्ये प्रथम नोंदणी करावी लागेल, त्यानंतर लॉगिन करून अर्ज सादर करायचा आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क भरावे लागेल.
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹२५ असून, अनुसूचित जाती-जमाती, महिला आणि बेंचमार्क अपंगत्व असलेल्या उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे शुल्क उमेदवार SBI शाखेत रोख रक्कम, नेट बँकिंग, UPI, किंवा डेबिट/क्रेडिट कार्ड यांपैकी कोणत्याही पर्यायाने भरू शकतात.
ही भरती प्रक्रिया यूपीएससीच्या अंतर्गत एक प्रतिष्ठित संधी असून, इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण माहिती तपासूनच अर्ज करावा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE