खुशखबर !! पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे वाढणार ! राज्य शासन व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरावरील पशू विभागातील श्रेणी २ मधील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे श्रेणी १ मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या बदलाअंतर्गत पशुधन पर्यवेक्षकांच्या जागी आता पशुधन विकास अधिकारी हे पद निर्माण केले जाईल.
जिल्हा परिषद अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या ६७ दवाखान्यांचे श्रेणी २ मधून श्रेणी १ मध्ये वर्गीकरण करण्यात येणार असून त्यामुळे पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमध्ये वाढ होणार आहे.

या बदलामुळे ग्रामीण भागातील पशूंवर वेळेत उपचार मिळण्याची शक्यता वाढणार असून, पशुवैद्यकीय सेवेतील सध्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. सध्या तालुकास्तरावर सहा पशु चिकित्सालये आणि ग्रामीण भागात ६७ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. मात्र, रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने या दवाखान्यांचे व्यवस्थापन अडचणीत आले आहे.
ग्रामीण भागातील पाळीव जनावरांना वेळीच उपचार मिळत नसल्याने जनावरे मृत पडण्याचा धोका वाढतो आहे. काही वेळा शेतकऱ्यांनाच जनावरांवर उपचार करावे लागतात. या पार्श्वभूमीवर शासनाने २,७९५ पशुधन विकास अधिकारी पदांची भरती जाहीर केली आहे. त्यातील १४७ पदे जिल्हा परिषद (६७) आणि राज्य शासनाच्या (८०) दवाखान्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
पशू विभागाने शासनाकडे मागणी केली आहे की, या रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी. ही पदे भरली गेल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जनावरांच्या उपचारासाठी आवश्यक सेवा नियमित व वेळेत मिळू शकते, आणि पशूधनाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.
शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकर व्हावी, अशी अपेक्षा सध्या पशुपालक, शेतकरी व विभागीय अधिकारी व्यक्त करत आहेत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati