वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महिलांना ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार दरमहा ७००० रुपये ! आताच अर्ज करा

सर्व आणि फक्त महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या या योजनेच्या मार्फत महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार आहेत. ती योजना म्हणजे कोणती योजना ? ती विमा सखी योजना ही  आहे. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. या योजनेचा लाभ फक्त महिलांना घेता येईल. महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात तशीच ही एक योजना आहे. ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला ७ हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज कुठे आणि कसा करायचा? पात्रता काय ? कागदपत्रे काय लागतील ? या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

या योजनेच्या माध्यमातून गरजू आणि पात्र महिलांना  आर्थिक लाभ  मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की  महिलांनी स्वावलंबी बनावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करायच्या आहे. त्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाईल.

Vima Sakhi Yojana 2025

या योजनेचा लाभ 

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांच्या अंतर्गत महिलांना आर्थिक साहाय्य दिले जाते. आता सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तर काही योजना अंतर्गत महिलांना कर्ज सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे. या सर्व योजनांचा एकच उद्देश आहे, महिलांनी स्वावलंबी बनाव.  हे सर्व पाहून सरकारी विमा कंपनी एलआयसी ने महिलांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याचे नाव विमा सखी योजना ठेवले आहे.

दरमहा ७ हजार रुपये कसे मिळतील ?

महिलांना सांगण्यात येते की भारत सरकार आणि एलआयसी यांच्या प्रयत्नातून एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 5 ते 7 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला एलआयसी एजंट व्हावे लागणार आहे. इतकंच नव्हे तर एलआयसी एजंट होण्याकरिता ट्रेनिंग सुद्धा दिली जाते. ट्रेनिंग दरम्यान महिलांना पाच हजार ते सात हजार रुपये पर्यंत दिले जाणार आहे. ट्रेनिंग पूर्ण होईल त्यानंतर महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. अधिकृत माहितीनुसार सांगायचे तर सरकारचं लक्ष हेच आहे की या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी एक लाख महिला विमा सखी बनल्या पाहिजे.

पात्रता काय ?

एलआयसी विमा सखी योजनेसाठी फक्त महिलांच अर्ज करू शकतात. या योजनेसाठी पुरुषांना कोणत्याही प्रकारची संधी दिलेली नाही. ज्या महिलांना अर्ज करायचे आहे त्यांचं कमीत कमी व 18 वर्ष तर जास्तीत जास्त वय 70 वर्ष असणे आवश्यक आहे. याचबरोबर शैक्षणिक पात्रता किमान दहावा वर्ग पास असणे गरजेचे आहे. लक्ष द्या प्रत्येक महिलांची शैक्षणिक योग्यता दहावी पास असणे महत्त्वाचे आहे. महिलांजवळ आवश्यक कागदपत्रे पाहिजे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहे अशाच महिलांनी यासाठी अर्ज करावा.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

GMC जळगाव – २१ प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरती जाहीर

GMC Jalgaon Teaching Recruitment 2025 - Dean, Government Medical College and Hospital, Jalgaon invites Offline applications....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *