नोकरीची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागात विविध पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या भरती संदर्भात निवड प्रक्रिया कशी होणार आहे. त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. “या भरतीत अधिक्षक/निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी, रचना व कार्यपध्दती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित), बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) गट-ब या पदांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी wcd.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात
पदे : अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपद्धती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)
वेतन: पगार मॅट्रिक्स ९-१५, 41,800-1,32,300 + महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते
परीक्षा प्रक्रिया :
“लेखी परीक्षा: ४०० गुण”
“मुलाखत: ५० गुण”
“अंतिम निवड: लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांनुसार”
पात्रता :
महिला व बाल विकास विभाग किंवा ग्रामविकास विभागातील संबंधित संवर्गातील कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याची पात्रता आहे अर्ज करण्यासाठी 01 जानेवारी रोजी सादर केलेल्या पदावर सलग सात वर्षे नियमित सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क :
“सामान्य प्रवर्ग: 719
“मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग: 449”
“आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासन आदेशानुसार सवलत”
प्रमाणपत्र पडताळणी :
लेखी परीक्षा व मुलाखतीच्या निकालानंतर शिफारस पात्र उमेदवारांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
“पात्र उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी संबंधित विभागाकडून आयोजित केली जाईल”
परीक्षा योजना व शिफारसीसंबंधी नियम जाहिरात, शासन निर्णय व आयोगाच्या कार्यनियमावलीशी सुसंगत राहतील
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
