वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आरोग्य सेवक नियुक्ती कधी होणार ? जाणून घ्या

When will the Health Worker appointment take place?  : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक पुरुष (५० टक्के) पद भरतीअंतर्गत १२३ पदांच्या भरतीची प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२३ पासून जाहिरातीद्वारे राबविण्यात आली. आता दीड ते पावणे दोन वर्षांचा कालावधी उलटूनही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. अंतिम निवड यादी घोषित न झाल्याने उमेदवारांची घालमेल वाढलेली आहे.

आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी २४ जुलै २०२४ मध्ये म्हणजेच जवळपास वर्षभरानंतर उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. याद्वारे निवड झालेल्या नॉनपेसा उमेदवारांची १८ सप्टेंबर रोजी कागदपत्रे पडताळणी प्रक्रियासुद्धा पूर्ण करण्यात आली; परंतु १४ ऑक्टोबर रोजी ग्रामविकास विभागाने हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना पदभरतीत प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. त्यानंतर शिल्लक जागेवर मेरिटनुसार नियुक्ती देण्याबाबत स्पष्ट केले, तसेच पेसा उमेदवारांची ९ व १० डिसेंबर २०२४ रोजी कागदपत्र पडताळणी करण्यात आली. मात्र, अजूनपर्यंत अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली नाही.

Aarogay sevak Bharti update

आरोग्य सेवक पदभरती प्रक्रियेमध्ये न्यायालयीन प्रकरण उ‌द्भवल्यामुळे भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मात्र ६ मार्च २०२५ रोजी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने १५ ऑक्टोबर २०२४ च्या परिपत्रकाला अनुसरुन निर्णय दिला.

तसेच १२ मार्च २०२५ रोजी निवड प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यासाठी शासनाने परिपत्रक काढले. २८ मार्च रोजी नागपूर विभागीय आयुक्तांनी भरती प्रक्रियेस परवानगीचे आदेशही दिले; परंतु अजूनपर्यंत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सुशगंगा पब्लिक स्कूल, वणी, जि. यवतमाळ – टीजीटी, पीजीटी आणि पूर्व प्राथमिक शिक्षक पदांसाठी मुलाखत आयोजित

SPS Wani Recruitment 2026 - Sushganga Public School, Wani, Dist. Yavatmal has arranged interview on date 15/4/2026 to fill up posts.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *