महाराष्ट्र सरकारने कामगारांना भांडी संच देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना गृहपयोगी भांडी संच मिळणार आहे. त्यासाठी आधी नोंदणी करायची आहे. ती कुठे आणि कशी करायची ? या बद्दल सविस्तर माहित जाणून घ्या. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचे वितरण आता नवीन सुधारित पद्धती नुसार करण्यात येणार आहे. http://hikit.mahabocw.in/appointment या अधिकृत संकेतस्थळावर १ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रणाली सुरु करण्यात येत असून, १५ जुलै २०२५ पासून प्रत्यक्ष संच वितरणास सुरुवात होणार आहे.
बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंचा संच मोफत देण्यासाठी राज्यभरात जिल्हानिहाय वितरण केंद्रे निश्चित केली असून , कामगारांना त्यांच्या नोंदणी असलेल्या जिल्ह्याच्या वितरण केंद्रातूनच संच प्राप्त करता येईल.
सर्व जिल्ह्यातील कामगारांना त्यांच्या जिल्ह्यातील वितरण केंद्रावरच संच दिला जाईल. बांधकाम कामगाराने संकेतस्थळावर आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉग इन करायचे आहे. जर कामगाराची नोंदणी निष्क्रिय असेल किंवा यापूर्वी संच घेतलेला असेल , तर तो या योजनेस अपात्र ठरेल.
पात्र कामगार आपल्या सोयीने दिनांक व केंद्र निवडू शकतो. त्यानंतर त्याला Appointment Letter मिळेल. Appointment Letter, आधार कार्ड/मंडळ ओळखपत्र घेऊन कामगाराने दिलेल्या दिनांकास संबंधित केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. केंद्रावर बायोमेट्रिक ओळख व ऑनलाइन फोटो घेण्यात येईल. त्यानंतरच गृहपयोगी वस्तूंचा संच दिला जाईल.
संच प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्याने मंडळाचे ओळखपत्र अथवा आधार कार्ड व Appointment Letter घेऊन ठरवलेल्या दिवशी वितरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तेथे बायोमेट्रिक पडताळणी व ऑनलाईन छायाचित्र घेण्यात येणार असून त्यानंतरच गृहपयोगी वस्तूंचा संच ताब्यात दिला जाईल.
मंडळाच्या निर्देशानुसार, प्रत्येक कुटुंबास (पती किंवा पत्नी) केवळ एकदाच संच अनुज्ञेय राहणार आहे. तसेच, केंद्रात दररोज २५० लाभार्थ्यांना संच वितरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, कोणत्याही कारणास्तव Appointment Letter शिवाय संच वितरण केले जाणार नाही.
या संदर्भात अधिक माहिती व अपॉइंटमेंटसाठी कामगारांनी http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE