JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद शिक्षकांची ९८६ पदे रिक्तच, भरतीनंतरही स्थिती अडचणीची

The decision to recruit teachers sent a message that the government is positive to maintain the quality of Zilla Parishad schools, which are considered as the foundation of education in rural areas. This recruitment was stalled for many years. The number of inter-district transfer of teachers is also increasing every year, causing educational loss to the students. The issue was taken up by the opposition including the parents. The Zilla Parishad Education Department started demanding that vacant posts be filled.

Out of two thousand primary teacher posts vacant in the district, 1 thousand 68 teachers have been recruited through Pavitra portal. Among them 1 thousand 14 teachers have been received by Ratnagiri district; But even after this recruitment process, 986 posts of teachers will remain vacant in Zilla Parishad schools. The question is being raised about how to solve the problem of those posts and also the percentage of local teachers in the recruitment is less.

It was demanded that all the teaching posts should be filled. It is also expected to fill up the posts left after the recruitment in the current recruitment. For this, the government should take action as soon as possible, otherwise there may be shortage of teachers again, said Santosh Therade, former Zilla Parishad President.

जिल्ह्यात रिक्त असलेल्या दोन हजार प्राथमिक शिक्षकांच्या पदांपैकी १ हजार ६८ शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे केली आहे. त्यामध्ये १ हजार १४ शिक्षक रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेले आहेत; मात्र ही भरती प्रक्रिया केल्यानंतरही जिल्हा परिषद शाळांमध्ये ९८६ शिक्षकांची पदे रिक्त राहणार आहेत. त्या पदांचा प्रश्न कसा सोडवणार, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच झालेल्या भरतीमध्ये स्थानिक शिक्षकांचा टक्का कमीच आहे.

शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा पाया समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी शासनाने सकारात्मक असल्याचा संदेश गेला. ही भरती गेली अनेक वर्षे रखडली होती. आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्याही दरवर्षी वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. हा विषय पालकांसह विरोधी पक्षाकडून उचलून धरण्यात आला होता. रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे होऊ लागली.

जिल्ह्यात पावणेसहा हजार शिक्षकांपैकी दोन हजारहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त होती. शासनाने एकूण रिक्त पदापैकी ७० टक्के पदे भरण्यास अनुमती दिली होती. त्यानुसार नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार राबवण्यात आलेल्या शिक्षक भरतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला १ हजार ६८ शिक्षक मिळाले. त्यातील ५४ उमेदवारांनी पडताळणीवेळी उपस्थित राहणे टाळले.

त्यामुळे १ हजार १४ पदांवर उमेदवार निश्चिती झाली आहे. त्या शिक्षकांना लवकरच शाळा देण्यात येणार आहेत. एकीकडे शिक्षक भरती केली जात असली तरीही ९८६ पदे रिक्तच राहणार आहेत. हा आकडा मोठा असल्यामुळे पुन्हा काही शाळांमध्ये शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नव्याने भरती झालेल्या शिक्षकांना रिक्त शाळा देण्यापूर्वी कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्या कराव्यात, अशी मागणी केली आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *