माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. आता १ कोटी ७५ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये महिना सरळ खात्यात जमा होणार . महिलांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. जुलै २०२४ पासून सुरु झालेल्या या योजनेचा भरपूर फायदा झालेला आहे. या विषयी अधिक माहिती जाणून घ्या.

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेचा जवळपास पंधरा महिने झाले आहे. या योजनेत सुरुवातीला २.४ कोटी लाभार्थी होते. यानंतर अपात्र ठरलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. याचसोबत अनेक पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतला होता त्यांनाही वगळण्यात आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत तब्बल ७२ लाख अर्ज वगळण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले होते. यामध्ये लाखो महिलांनी केवायसी केले नाही तर अनेक महिलांच्या केवायसीत अडचण आहेत. एकूण ७२ लाख महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये. आता १ कोटी ७५ लाख महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत जुलै २०२४ पासून लाभ देण्यास सुरुवात झाली होती. २ कोटी ४७ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळत होता. त्यानंतर सरकारने प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये निकषामध्ये न बसणाऱ्या सर्व महिलांना वगळण्यात आले. मागच्या १५ महिन्यात एकूण ७२ लाख महिलांना वगळण्यात आले आहे, याबाबत लोकसत्ताने वृत्त दिलं आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदत आता वाढवून देण्यात आली आहे. आता लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती ३० एप्रिलपर्यंत करु शकतात. तुमच्याकडे १ महिन्याची मुदत आहे. त्यामुळे या कालावधीत लाडक्या बहिणींनी केवायसी करायची आहे.
अधिक माहितीसाठी https://majhinaukri.net.in/ या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati