वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

RTE Admission साठी २ लाख ८८ हजार अर्ज आलेत ! जाणून घ्या सविस्तर माहिती !

नवीन बातमी ,RTE प्रवेशासाठी  महाराष्ट्र राज्यात दोन लाख ८८ हजाराहून अधिक मुलांचे अर्ज आलेले आहेत. प्रवेशासाठी ऑनलाईन सोडत होणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा . 

RTE Online Admission process 2026

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून अधिक बालकांचे अर्ज आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत आणि प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने नमूद केले आहे. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे खासगी शाळांमधील आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाते.

RTE Admission online

यंदा राज्यातील आठ हजार ७०१ शाळांमध्ये एक लाख १४ हजार ८३३ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातील शाळा निवडण्याचे शिक्षण विभागाने घातलेले बंधन उच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर शिक्षण विभागाने एक किलोमीटरची मर्यादा काढून अर्ज भरण्यासाठी पालकांना संधी उपलब्ध करून दिली होती.

त्यानुसार अर्ज भरण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदत दिली होती. मात्र, त्याला पुन्हा मंगळवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीपर्यंत दोन लाख ८८ हजारांहून अधिक बालकांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी या प्रवेशासाठी जवळपास तीन लाखांहून अधिक अर्ज आले होते. यंदा अर्जाच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.

अधिक माहितीसाठी आमच्या  https://majhinaukri.net.in/ या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

SBI Bank Bharti 2026

खुशखबर !! SBI बँकेत १ हजार ५३८ लिपिक पदांची भरती ,नवीन जाहिरात प्रकाशित; लगेच अर्ज करा ! SBI Bank Bharti 2026 1538 Posts

Here is some good news for candidates aspiring to work in the banking sector. An …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *