IAF Agniveer Result: भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) अग्निवीरवायू भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेला (Result) बसलेले उमेदवारांना हा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. उमेदवाराला संकेतस्थळावर आपला निकाल आणि सिलेक्शन स्टेट्स तपासता येणार आहे.
निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://agnipathvayu.cdac.in/वर लॉग इन करावे लागेल. निकाल तपासण्यासाठी थेट लिंक खाली दिली आहे. अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटिसनुसार, “24 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत ऑनलाइन आयोजित अग्निवीरवायू (Agniveer)सेवक01/2022 चा निकाल जाहीर झाला आहे. या वेबसाइटवर कँडिडेट सिलेक्शन लिस्ट उमेदवारांना आपले नाव पाहता येईल. याव्यतिरिक्त, निवड झालेल्या उमेदवारांना एसएमएस आणि ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे.
निकाल कसा बघायचा?
1: वायुसेना अग्निपथच्या , agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2: आता मुख्यपृष्ठावर, कँडिडेटच्या सिलेक्शन विभागात जा.
3: आता तुमच्या क्रेडेन्शियल्सच्या मदतीने लॉगिन करा.
4: तुमच्या प्रोफाइलमधील रिझल्टच्या टॅबवर क्लिक करा.
5: निकाल तपासा आणि तो तुमच्याकडे सेव्ह करा.
IAF अग्निवीर निकाल 2022 @agnipathvayu.cdac.in: भारतीय वायुसेनेने ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत 24 जुलै 2022 रोजी परीक्षा घेण्यात आले होती. IAF नुसार, लाखो उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला होता. या परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना 01 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या PSL पात्रता फेरीसाठी बोलावले जाणार आहे.
भारतीय वायुसेना अग्निवीर भरतीचा निकाल | |
निकाल डाउनलोड करा | येथे क्लिक करा |