JOIN Telegram
Monday , 25 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय आयटीआय’लाच विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती !

शासकीय आयटीआय’लाच विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती !

ITI Maharashtra Admission 2024 : शासकीय आयटीआय अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. यंदाही शासकीय आयटीआयमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर प्रवेश पूर्ण झाले. ६ हजार २४७ जागांवर प्रवेश रिक्त राहिले आहेत. शासकीय यटीआयमधील प्रवेशात छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ९७.७१ टक्के जागांवर प्रवेश पूर्ण झाले. मराठवाड्यात एकूण १४४ आयटीआयची संख्या आहे. २२ हजार ९६४ जागांपैकी १९ हजार ३५४ जागांवर प्रवेश झाले.

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील (आयटीआय) रिक्त जागांचा आकडा यंदा वाढला. २०२४-२५ शैक्षणिक वर्षात १ लाख ५२ हजार ६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. चार महिने चाललेल्या प्रवेश प्रक्रियेनंतरही राज्यातील २७ हजार ५०१ जागांवरील प्रवेश रिक्त राहिले आहेत. यात खासगी आयटीआयमधील सर्वाधिक ३६ टक्के जागांवर प्रवेश रिक्त आहेत.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया जूनमध्ये सुरु झाली. प्रवेश प्रक्रियेत चार फेरी पूर्ण झाल्या. यानंतर संस्थास्तरावर एक समुपदेशन फेरी झाली. ही प्रवेश फेरी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्या झाली. यानंतरही जागा रिक्त आहेत. रिक्त जागांवर संस्थास्तरावर प्रवेशासाठीच्या समुपदेशन फेरीला मुदतवाढ देण्यात आली. आणि फेरी संप्टेंबर अखेरपर्यंत चालली. यानंतर रिक्त जागांचा संचालनालयातर्फे नुकताच आढावा घेण्यात आला. राज्यात यंदा एकूण आयटीआयमध्ये सुमारे ८२ टक्के जागांवर प्रवेश झाले. राज्यातील एकूण संस्थांमध्ये १८ टक्के जागा रिक्त आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत रिक्त जागांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येते. राज्यात शासकीय आयटीआयची संख्या ४१८ एवढी आहे. त्यामध्ये ९३ हजार ५३६ जागांसाठी यंदा प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. खासगी आयटीआयची संख्या ६०८ असून ५८ हजार ५२४ प्रवेश क्षमता आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षात १०२६ आयटीआयमधील १ लाख ५२ हजार ६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये १ लाख २४ हजार ५५९ जागांवर प्रवेश झाले आहेत.

शासकीय तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांस्तरावरील प्रवेशासाठी नियमित चार व समुपदेशन फेरीचे चार टप्पे झाले. जूनपासून सुरु झालेली प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत सुरु होती. रिक्त राहिल्या जागांमध्ये सर्वाधिक जागा खासगी आयटीआयमधील आहेत. राज्यात खासगी आयटीआयमध्ये ५८ हजार ५२४ प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी ३७ हजार १७० जागांवर प्रवेश पूर्ण झाले. २१ हजार २५४ जागा रिक्त राहिल्या आहेत.

शासकीय संस्थेला पसंती, छत्रपती संभाजीनगर पुढे

शासकीय आयटीआय अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. यंदाही शासकीय आयटीआयमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर प्रवेश पूर्ण झाले. ६ हजार २४७ जागांवर प्रवेश रिक्त राहिले आहेत. शासकीय यटीआयमधील प्रवेशात छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ९७.७१ टक्के जागांवर प्रवेश पूर्ण झाले. मराठवाड्यात एकूण १४४ आयटीआयची संख्या आहे. २२ हजार ९६४ जागांपैकी १९ हजार ३५४ जागांवर प्रवेश झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *