इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात ३४५ जागांसाठी भरती !
ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत सुपर स्पेशॅलिस्ट मेडिकल ऑफिसर, स्पेशॅलिस्ट मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर या पदांची भरती करण्यासाठी इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाने अधिसूचना प्रकाशित केली आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या माहितीनुसार ३४५ जागा भरण्यात येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये सुपर स्पेशॅलिस्ट मेडिकल ऑफिसर, स्पेशॅलिस्ट मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर या पदांच्या एकूण ३४५ जागा भरण्यात येत आहेत. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, अनुभव, अर्ज प्रक्रिया, तसेच निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती लेखात देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२४ आहे. अर्ज कारण्यापूर्व सर्व महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यासोबत प्रति जोडणे आवश्यक आहे.
पदाचे नाव – सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी या पदांची भरती करायची आहे.
पदसंख्या – ३४५ जागा
सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण ५ जागा उपलब्ध आहेत.
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण १७६ जागा उपलब्ध आहेत.
वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण १६४ जागा उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची पद्धत – अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२४ आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.itbpolice.nic.in/
Application Fees अर्ज शुल्क –
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवार या उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.
SC/ST/ माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही
Pay Scale: वेतनश्रेणी-
१. सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी या पदासाठी सुरुवातीला ७८,८०० रुपये पगार देण्यात येईल तो पुढे २,०९,२०० रुपयांपर्यंत जाईल.
२. विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी सुरुवातीला ६७,७०० रुपये दरमहा पगार देण्यात येईल. तो पुढे २,०८,७०० रुपयांपर्यंत जाईल.
३. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ५६,१०० रुपये पगार देण्यात येईल. तो पुढे १,७७,५०० रुपयांपर्यंत जाईल.
शैक्षणिक पात्रता-
सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस पदवी असणे महतवाचे आहे.
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
How to apply अर्ज प्रक्रिया-
वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२४ आहे. अपूर्ण अर्ज बाद करण्यात येतील. शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज https://www.itbpolice.nic.in/ या लिंक वरून सादर करावा.