डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ३०० रुपये भत्ता!
BAMU University News : ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ आणि मार्च-एप्रिल २०२४ च्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण पदवीधारकांसाठी दीक्षांत समारंभ आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याण विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक प्राध्यापक नामनिर्देशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून प्रा. संभाजी दराडे, जालना येथून प्रा. सुधाकर शेळके, बीड येथून प्रा. समाधान इंगळे, आणि धाराशिव येथून प्रा. संदीप देशमुख या चार समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना तीनशे रुपये भत्ता दिला जाणार आहे. येत्या आठवड्यात होणाऱ्या महोत्सवापासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या भत्त्याबद्दल निर्णय घेण्यात आला.
व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत नऊ ठराव आणि ऐनवेळेच्या सात ठरावांसह एकूण १६ विषयांवर चर्चा झाली. विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव २५ ते २९ डिसेंबर दरम्यान मुख्य परिसरात होणार आहे. महोत्सवात सहभागी होणाऱ्या युवा कलावंतांना संबंधित महाविद्यालयातर्फे फक्त १२० रुपये दैनंदिन भत्ता मिळत होता. विद्यार्थ्यांच्या प्रस्तावानुसार, भत्त्याची रक्कम वाढवून तीनशे रुपये करण्यास मान्यता देण्यात आली. या तीनशे रुपयांमध्ये युवा कलावंतांसाठी नाष्टा आणि भोजनाची व्यवस्था केली जाईल.
याशिवाय, २०२५ मध्ये सार्वजनिक सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यास, तसेच महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठासोबत कौशल्याभिमुख कोर्सेस सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली. कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी या सर्व निर्णयांची माहिती दिली.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE