Ladki Bahin Yojana April and May month installment come together : लाडकी बहीण योजनेबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या एप्रिल महिना संपायला काहीच दिवस उरले असूनही, सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की हप्ता कधी जमा होणार. काही दिवसांपूर्वी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी वक्तव्य करताना सांगितलं होतं की, एप्रिल महिना संपण्याआधी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. मात्र सध्या केवळ सहाच दिवस शिल्लक असल्याने, हा हप्ता उशिराने म्हणजेच मे महिन्यात जमा होण्याची शक्यता अधिक आहे.
त्यामुळे आता एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे – जर एप्रिलचा हप्ता मेमध्ये दिला गेला, तर महिलांना एकत्र ३००० रुपये मिळणार का, की दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये प्रत्येकी १५०० रुपये दिले जातील?
दरम्यान, लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या महिलांची सखोल पडताळणी सुरू आहे. विशेषतः अर्जदार महिलांचे उत्पन्न तपासलं जात असून, या आधारावर अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये अपात्र महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ही संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे केवळ पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकूणच, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता कधी आणि कसा जमा होणार, याबाबत स्पष्टता लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE