JOIN Telegram
Friday , 25 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पहलगाम हल्ल्याचा परिणाम : जम्मू-काश्मीरमधील शाळा, कॉलेज बंद; परीक्षा पुढे ढकलल्या !  Pahalgam Attack Schools and Colleges Shut in Jammu & Kashmir; Exams Postponed

 Pahalgam Attack Schools and Colleges Shut in Jammu & Kashmir; Exams Postponed : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षण संस्थांना तात्पुरती सुट्टी, परीक्षा पुढे ढकलल्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.

या हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जम्मू विद्यापीठाच्या सुरू असलेल्या सर्व परीक्षा तात्पुरत्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Pahalgam attack school,colleges closed and exam postponed

या भयानक हल्ल्यात २८ निरपराध नागरिकांचा बळी गेला असून २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पहलगामच्या बैसनर खोऱ्यात दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला आणि काही पर्यटकांना त्यांच्या धर्माच्या आधारे लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या क्रूर हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियावर लोक मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करत आहेत.

जम्मू विद्यापीठाने आपले सर्व शैक्षणिक उपक्रम तत्काळ रद्द केले असून, नियोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, काश्मीर विद्यापीठ आणि श्रीनगरच्या क्लस्टर विद्यापीठात देखील परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना नवीन तारखांची लवकरच माहिती दिली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे चार दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यापैकी दोन जण पाकिस्तानी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा परिणाम फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही जाणवतो आहे. सोशल मीडियावर #PahalgamTerroristAttack आणि #Modi हे हॅशटॅग जोरदारपणे ट्रेंड होत असून दोन्ही देशांमध्ये अस्वस्थता आणि अशांतता दिसून येत आहे.

हा हल्ला मानवतेविरुद्धची अमानवी कृती असून देशातील लोक एकदिलाने या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत. अशा हिंसक कारवायांना रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होऊ लागली आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *