Medical study Provisional Registration Certificate : Medical study परदेशातून करून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे . परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
भारतात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी या विद्यार्थ्यांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) तर्फे घेण्यात येणारी परिक्षा (FMGE) उत्तीर्ण करावी लागते. ही परीक्षा पास केल्यानंतरच त्यांना भारतात इंटर्नशिप करण्याची परवानगी मिळते.
सध्याच्या नियमांनुसार, इंटर्नशिप सुरु झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमार्फत प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (PRC) मिळणे आवश्यक असते. मात्र यावर्षी, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या NEET PG प्रवेश परीक्षेचे अर्ज १७ एप्रिलपासून सुरू झाले असून ७ मेपर्यंत सुरू राहणार आहेत. अशा परिस्थितीत, अनेक परदेशी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत PRC मिळाले नव्हते. अगदी प्रोसेसिंगसाठी लागणारी फी भरायची लिंकही वेळेवर मिळाली नव्हती.
या सगळ्या घडामोडींमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता पसरली होती. विद्यार्थी महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेच्या अभ्यासाऐवजी PRC साठीची धावपळ करताना दिसत होते, ज्यामुळे त्यांचा अमूल्य वेळ वाया जात होता.
या समस्येची दखल भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार हिंगे यांनी घेतली. त्यांनी भाजपच्या विधान परिषद सदस्य उमा खापरे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर आमदार खापरे यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याशी थेट संपर्क साधून संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली आणि तातडीने कारवाई करण्याची विनंती केली.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देऊन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यांच्या निर्देशांनुसार, काही तासांतच विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी आवश्यक असलेल्या पेमेंट लिंक पाठवण्यात आल्या. लवकरच या सर्टिफिकेट्स देण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि विद्यार्थ्यांनी मोठा दिलासा घेतला.
अंदाजे १६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. राज्य शासनाने वेळेवर हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य वाचवले आहे. यासाठी विद्यार्थी व पालकांनी माधुरी मिसाळ, उमा खापरे आणि तुषार हिंगे यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
या सगळ्या प्रकरणातून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा प्रकारच्या त्रासदायक प्रक्रियांपासून विद्यार्थ्यांची सुटका होण्यासाठी अधिक स्पष्ट, वेळेत आणि उत्तरदायीत्वाने काम होणे आवश्यक आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE