वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नवीन माहिती !! आता एकाच कुटुंबातील दोन बहिणींना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार !

माझी लाडकी बहीण योजने बद्दल एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. आता एकाच कुटुंबातील दोन बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार . तिसऱ्या बहिणीला या योजनेच्या लाभा पासून वंचित केलेले आहे. एकाच कुटुंबातील  दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थीच्या नावापुढे ‘ एफएससी मल्टिपल इन फॅमिली ‘ असा शेरा मारून तिसऱ्या बहिणीचा लाभ बंद केला आहे. तसेच आता ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांची पडताळणी होणार आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ मिळणार असतानाही तिसऱ्या-चौथ्या महिलेनेही अर्ज केले. काहींनी रेशनकार्ड वेगळे असल्याचे सांगितले, वय १८ नसताना देखील अठरा पूर्ण असल्याचे दाखवून अर्ज केले. पण, आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थीच्या नावापुढे ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केला आहे. आता ऑगस्टपासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे. आत्तापर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक महिलांनी लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

Mazi Ladki Bahin Yojana 2025

“लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील दोन कोटी ५७ लाख महिलांनी अर्ज केले. त्यात १८ ते ६५ वयोगटातील महिला पात्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, एकाच कुटुंबातील दोन महिला, लाभार्थीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नको, लाभार्थी दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी, अशा अटी आहेत. तरीपण, एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी, आधारकार्डवरील जन्मतारीख बदलून, कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसून वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचे भासवून योजनेच्या लाभासाठी अर्ज केले. त्या सर्वच निकषांची पडताळणी झाली असून आता प्राप्तिकर विभागाने महिला व बालविकास विभागाला माहिती दिली आहे.

त्याआधारे लाडक्या बहिणींची पडताळणी होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ‘लाडकी बहीण’चा लाभ बंद झालेल्या अनेक महिला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणींना तक्रार नोंदवण्यासाठी ‘ग्रिवन्स’ हा पर्याय दिला आहे. त्यासाठी अर्जदारास स्वत:चा लॉगिन आयडी तयार करून त्यावरून महिलांना तक्रार नोंदविता येते.

याशिवाय महिला व बालविकास कार्यालयात किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये देखील ऑफलाइन तक्रारी अर्ज देता येतो. त्याठिकाणी तक्रारींची संख्या दहा लाखांवर पोचली आहे. आतापर्यंत दरमहा लाभ मिळाला पण, आता अचानक लाभ बंद झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ६५ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांचा लाभ आपोआप बंद होत आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचेही लाभ आता बंद केला आहे. लाभ बंद झालेल्यांच्या नावापुढे ‘आरटीओ रिजेक्टेड’, ‘आदर स्कीम बेनिफिशियरी’ आणि आता ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

BMC Job Vacancy 2024

BMC DMMGH – रु. ३०,०००/- दरमहा वेतन ; २ अधिपरिचारिका पदांसाठी अर्ज करा !

BMC DMMGH Staff Nurse Recruitment 2025 - Bruhanmumbai Municipal Corporation, Mumbai invites Offline applications....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *