वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय IT कंपन्यांना धोका ; मार्केट कोसळल , नोकऱ्यांवरही गदा ? जाणून घ्या सविस्तर माहिती !

महत्वाची बातमी ! अमेरिकेतून आलेल्या एका बातमीने जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राला धक्का बसला आहे. भारतीय आयटी कंपन्यांचे शेअर्सची जोरदार विक्री होत आहे. भारतीय IT कंपन्यांना धोका जाणून घ्या या बद्दल सविस्तर माहिती .

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

IT Sector News 2026

अमेरिकेतून आलेल्या एका बातमीमुळे भारतीय आयटी कंपन्यांचे धाबे द‌णाणले आहेत. आज बाजार उघडताच इन्फोसिस, विप्रोसारख्या कंपन्यांचे शेअर्स धडाधड आपटले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अँथ्रोपिकने आपल्या ‘क्लॉड कोवर्क’ या नव्या एजंटसाठी ११ प्लग-इन्स लाँच करताच जागतिक शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. हा नवा Al असिस्टंट कायदेशीर कामे, विक्री आणि मार्केटिंगची कामे स्वयंचलित करणार असल्याने, पारंपारिक सॉफ्टवेअर आणि आयटी सेवा देणाऱ्या कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याची भीती निर्माण झाली आहे. या बातमीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी टेक शेअर्सची जोरदार विक्री सुरू केली असून, यात भारतीय आयटी कंपन्यांचेही कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.

सॉफ्टवेअर कंपन्यांचे मरण?
ब्रोकरेज फर्म जेफरीजने या परिस्थितीला ‘सासपोकॅलिप्स’ असे नाव दिले आहे. याचा अर्थ सॉफ्टवेअर-एज-अ-सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांसाठी हा प्रलय ठरू शकतो. क्लॉडचा नवा ‘लीगल एजंट’ आता कागदपत्रांचे पुनरावलोकन, कंप्लायन्स चेक आणि कायदेशीर मसुदे तयार करण्याचे काम स्वस्त आणि जलद करणार आहे. पूर्वी ज्या कामांसाठी सेल्सफोर्स किंवा सर्व्हिसनाऊ सारख्या प्लॅटफॉर्मची गरज लागायची, ती कामे आता क्लॉड थेट त्या सिस्टमशी जोडून स्वतः करू शकणार आहे.

भारतीय आयटी कंपन्यांनाही धसका
भारतीय कंपन्यांचा महसूल प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमधील आउटसोर्सिंगवर अवलंबून आहे. या भीतीपोटी भारतीय आयटी शेअर्समध्येही मोठी विक्री झाली.
1. इन्फोसिस : ५.५% घसरण
2. विप्रो : ४.८% घसरण
3. कॉग्निझंट : १०% घसरण
4. एसेंचर : ९.५% घसरण

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *