महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council)जून- 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल (Government Computer Typing Certificate Exam Result)जाहीर करण्यात आला आहे. परिषदेतर्फे मराठी, हिंदी, इंग्रजी 30 व 40 शब्द प्रति मिनिट या परीक्षा घेण्यात आल्या. त्यात मराठी 40 शब्द प्रति मिनिट या परीक्षेचा निकाल 46.830 टक्के एवढा लागला आहे. तर हिंदीचा निकाल 40.22 टक्के एवढा लागला. अधिक माहिती जाणून घ्या .
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
http://www.mscepune.in/ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची ऑनलाईन प्रिंट घेता येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे 30 शब्द प्रति मिनिट-मराठी या टायपिंग परीक्षेसाठी 58 हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील 31 हजार 290 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इंग्रजी परीक्षेसाठी 74 हजार 631 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 46 हजार 354 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 40 शब्द प्रति मिनिट-इंग्रजी परीक्षेसाठी 49 हजार 233 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 27 हजार 905 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा निकाल 62.63 टक्के लागला आहे.
तर मराठी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 4 हजार 70 विद्यार्थ्यांपैकी केवळ 1 हजार 773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या परीक्षेचा निकाल केवळ 46.83 टक्के लागला आहे. तसेच हिंदी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 190 विद्यार्थ्यांपैकी 72 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे / गुणपत्रके डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधीत संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात येतील. सदरील प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे 100 जीएसएम (GSM) कागदावर करुन विद्यार्थ्यांना वितरीत करावे.
तसेच संबंधीत विद्यार्थ्यास सॉप्टकॉपी PDF स्वरुपात देण्यात यावी. जेणे करुन विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार सदरील प्रमाणपत्र कलर प्रिंटद्वारे 100 जीएसएम (GSM) कागदावर छपाई करुन घेता येईल. संस्थांनी संबंधीत विद्यार्थ्यास प्रमाणपत्र/गुणपत्रके वितरीत केलेली पोहोच दप्तरी जतन करुन ठेवावी,असे राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रसिद्धी परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून १० दिवसात परीक्षार्थीने गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रुपये १००/- प्रमाणे व छायाप्रतीसाठी मिळण्यासाठी प्रति विषय रूपये ४००/- प्रमाणे रक्कम ऑनलाईन पध्दतीने दिनांक २९/०८/२०२५ पर्यंत भरण्यात यावेत.
गुणपडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसात पुर्न-मुल्यांकनासाठी प्रती विषय रु.६००/- प्रमाणे ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरुन अर्ज करावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत,असेही परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओके यांनी कळवले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE