वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर !! भारतीय सैन्यात एक लाख अग्निविरांची मेगाभरती सुरु ! मोठा फायदा होणार

ज्या तरुणांना भारतीय सैन्यात नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्या साठी आता एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्यात १ लाख अग्निविरांची भरती होणार आहे. या भरती मुळे तरुणांना देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहिती खाली दिलेली आहे. ती सविस्तर वाचा 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Indian Army Bharti for 1 lakh Agniveer Posts 2025

भारतीय थल सेना पुढच्या वर्षांपासून आता सुमारे एक लाख अग्निवीरांचा भरती कणार आहे. त्यामुळे ज्यांना भारतीय सैन्यात सेवा करायची आहे त्यांच्यासाठी मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे तरुणांना रोजगारासोबत देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. सध्या भारतीय सैन्यात सैनिकांचा तुटवडा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय थल सेनेने पुढच्या वर्षांपासून अग्निवीरांची भरती जवळपास दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या लष्करात १.८ लाख सैनिकांची कमतरता आहे. कोरोना काळात दोन वर्षे भरती थांबली होती. यामुळे सैनिकांची कमतरता जाणवत आह. आता ही उणीव भरुन काढण्यासाठी आणि २०२६ पासून अनेक सैनिक निवृत्त होत आहे.

त्यामुळे ही बंपर भरती आयोजित केली आहे. ट्रेनिंग सेंटर देखील वाढवण्यात येणार आहेत. भारतीय लष्करात लवकरच अग्निवीर जवानाची भरती जवळपास दुप्पट केली जाणार आहे. येत्या भरती चक्रापासून दरवर्षी एक लाख नवी अग्निवीर भरती केले जाणार आहेत. आता सुमारे तीन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये केवळ ४० हजार अग्निवीरांची भरती केली होती. आताही संख्या अडीच पट वाढणार आहे.

का होत आहे इतकी मोठी भरती ? – सध्या भारतीय सैन्यात पायदळात सुमारे १ लाख ८० हजार सैनिकांची कमतरता आहे. साल २०२०-२१ मध्ये कोरोना काळामुळे दोन वर्षे भरती थांबवली होती. तसेच दरवर्षी ६० – ६५ हजार सैनिक निवृत्त होत आहेत. परंतू त्याबदल्यात नवीन सैनिक भरती झालेले नाहीत. त्यामुळे ही कमतरता दरवर्षी २० ते २५ हजाराने वाढत गेली. अग्निवीर योजना सुरु झाल्यानंतर देखील ही कमतरता भरुन निघालेली नाही.

आतापर्यंत किती अग्निवीर आले?- २०२२ ते २०२५ च्या अखेर पर्यंत एकूण १ लाख ७५ हजार अग्निवीर भरती होणार आहेत. परंतू ही संख्या देखील कमी पूर्ण करण्यास पुरेशी नाही. त्यामुळे आता नवीन एक लाख पदे भरली जाणार आहेत.

पुढची योजना काय ? पुढच्या वर्षांपासून दरवर्षी सुमारे १ लाख अग्निवीर भरती करण्याची तयारी करण्यात आली आहे. पहिल्यांदा २०२६ च्या डिसेंबरपासून जुने अग्निवीर निवृत्त होण्यास सुरुवात होणार आहेत. त्यामुळे आता नव्या मुलांना घेण्याची गरज आहे. त्यामुळे संख्या वाढणार आहे. सैन्यातील ट्रेनिंग सेंटरची क्षमता वाढवली जाणार असून एकसाथ जास्त मुलांना चांगले ट्रेनिंग त्यामुळे मिळणार आहे.

भारतीय लष्कराचे म्हणणे काय ? भारतीय लष्कराच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले की जेवढी कमतरता आहे तेवढी भरती केली जाणार आहे. प्रशिक्षणाचा दर्जा अजिबात घसरु दिला जाणार नाही. ट्रेनिंग सेंटर सांभाळू शकतील तेवढेच अग्निवीर घेतले जातील

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

अर्ज सुरु !! जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) अंतर्गत विविध पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित !!

Jawaharlal Nehru Port Authority Recruitment 2025 JNPA Job Recruitment 2025 – Jawaharlal Nehru Port Authority …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *