वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MPSC २०२६ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ! जाणून घ्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२६ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे  वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. प्रसिद्ध करण्यात आलेलं हे वेळापत्रक अंदाजित वेळापत्रक असून, जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

MPSC Exam 2026 Timetable

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) २०२६ या वर्षाभरात नियोजित प्रशासकीय सेवेतील गट अ आणि गट ब संवर्गातील (Group A and Group B cadre exams) विविध रिक्त पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजे वेळापत्रक (Estimated exam schedule for the year 2026) प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व तयारी करण्याच्या दृष्टीने ही महत्ताची अपडेट मानली जात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुंबई अवर सचिव ओतारी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२६ मध्ये नियोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. प्रसिद्ध करण्यात आलेलं हे वेळापत्रक अंदाजित वेळापत्रक असून, जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे यामध्ये आयोगाकडून नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२६ मध्ये नियोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन केलं जात. त्यानुसार सन २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे तारखांनुसार वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी व आयोगाला परीक्षेचे पूर्व नियोजन करणं सोपं जात. संबंधित परीक्षेचे परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

संबंधित सर्व गोष्टींची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर अद्यावत करण्यात येणार आहे. वेळापत्रकातील सन २०२६ मधील दिनांक निश्चित नसलेल्या परीक्षांचे दिनांक संबधित परीक्षेच्या जाहिरात/अधिसूचनेद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे. याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक आहे, असे देखील यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Maharashtra Scholarship Exam 2025 date Postponed

महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ साठी अर्ज करण्याची मुदत वाढली !

 इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *