BMC Recruitment 2025 : मुंबई महानगरपालिका BMC अंतर्गत वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल लागून ४५ दिवस उलटले, तरीही अद्याप महापालिकेकडून भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. या प्रक्रियेला का विलंब होत आहे. याचे कारण जाणून घ्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मुंबई महानगरपालिकेने वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदासाठी परीक्षा घेतली. निकाल लागून ४५ दिवस झाले तरी भरती प्रक्रिया सुरू झाली नाही. यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे. पूर्वी मुलाखतीतून होणाऱ्या भरतीत गैरव्यवहार होत असल्याने परीक्षा घेण्यात आली. आता पदव्युत्तर पदवीधारकांना अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय झाला आहे.
भाग कार्यालयांमधील वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदाच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी यंदा मुंबई महानगरपालिकेने परीक्षा पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी घेतलेल्या भरती परीक्षेचा निकाल लागून जवळपास ४५ दिवस उलटले असले, तरीही अद्याप महापालिकेकडून भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. या प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य प्रभागांमध्ये वैद्यकीय अधिकारी हे पद महत्त्वाचे आहे. खाद्यपदार्थ विक्री परवाने, शुश्रुषागृह परवानगी आणि इतर सार्वजनिक आरोग्यविषयक परवाने यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे असतात. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामधील ही पदे अनेक वर्षांपासून अंतर्गत भरतीद्वारे मुलाखतीच्या माध्यमातून भरली जात होती. त्यात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी येण्याचे प्रमाण वाढले होते. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेने यावर्षी प्रथमच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० ऑक्टोबरला परीक्षा पार पडली.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati