वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BMC मध्ये वयाच्या ६५ व्या वर्षी नोकरीची संधी ! आजच अर्ज करा

BMC Recruitment 2025 : मुंबई महापालिकेने एक अभिनव निर्णय घेत ज्येष्ठ नागरिकांसाठी नोकरीच्या संधीचा नवा मार्ग मोकळा केला आहे. सामान्यतः सरकारी, निमसरकारी संस्था आणि बँकांमधील कर्मचाऱ्यांना ५८ ते ६० व्या वर्षी सेवानिवृत्त केलं जातं. मात्र, महापालिकेने याला अपवाद ठरवत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीन असलेल्या मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेमार्फत ६५ ते ७० वर्षांपर्यंतच्या वयोगटातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

निवृत्तीनंतरही काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या, अनुभवी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

BMC Recruitment 2025

या भरतीअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टीबी हेल्थ व्हिजिटर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ अशा विविध पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वयोमर्यादा ७० वर्षे ठेवण्यात आली असून त्यांना दरमहा ६०,००० रुपये वेतन दिलं जाणार आहे. इतर पदांसाठी वयोमर्यादा ६५ वर्षे असून, वेतन श्रेणी ही पदांनुसार १५,५०० ते ७५,००० रुपये इतकी आहे. टीबी हेल्थ व्हिजिटर या पदासाठी १६ जागा असून प्रत्येकी १५,५०० रुपये मासिक वेतनासोबत १,५०० रुपयांचा वाहतूक भत्ताही दिला जाणार आहे. तसेच, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी २५,००० रुपये,उपचार पर्यवेक्षकासाठी २०,००० रुपये व सूक्ष्म जीवशास्त्रज्ञाला ७५,००० रुपये मानधन मिळणार आहे.

ही सर्व पदे कंत्राटी व मानधन तत्वावर भरण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज प्रत्यक्ष मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांच्या कार्यालयात चिंचपोकळी येथील बावलावाडी म्युनिसिपल कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलं आहे. सेवानिवृत्तीनंतरही समाजासाठी काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या नागरिकांना या निर्णयामुळे पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळणार असून, हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह ठरत आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

TISS SSW – MA (Social Work) ; रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर १ पदासाठी अर्ज करा !

TISS SDCO Job 2025 - School of Social Work, Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *