वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BSF मध्ये ३५८८ रिक्त पदांची भरती; १० वी पास तरुणांना संधी ! अर्ज कसा करावा ?

१० वी पास तरुणांसाठी बीएसएफ मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. BSF मध्ये कॉन्स्टेबल, ट्रेड्समॅन ३,५८८ रिक्त  पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया २६ जुलै २०२५ पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ ही  आहे.  अर्ज करण्यापूर्वी दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचावी. खाली दिलेली अधिसूचना वाचून मग अर्ज करावा. 

या नोकरीसाठी तुम्ही bsf.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी तुम्ही २६ जुलैपासून अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी २५ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती मोहिमेत ३,५८८ पदे भरली जाणार आहे. यातील ३,४०६ पुरुष उमेदवारांसाठी राखीव असणार आहे.

BSF Recruitment 2025

१८२ पदे ही महिला उमेदवारांसाठी असणार आहे. मोची, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशियन आणि इतर ट्रेडमधील भरती जाहीर करण्यात आली आहे BSF मधील या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाउटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे टेक्निकल ट्रेडमधील पदांसाठी १०वी पास असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये दोन वर्षांचा कोर्स करुन ITI सर्टिफिकेट प्राप्त केलेली असावी. नॉन टेक्निकल पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत स्कील्ड असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड टेस्टद्वारे होणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर तुमची निवड केली जाणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिसूचनेत दिलेली आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 550 रिक्त पदांकरिता; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज!!

New India Assurance Recruitment 2025 New India Assurance Job Recruitment 2025 – New India Assurance …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *