यावर्षी १० वी ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता २०२६ पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत. CBSE ने आज अधिकृतरीत्या या नियमांना मान्यता दिली आहे. सीबीएसई बोर्डाचे एक्झाम कंट्रोलर म्हणजेच परीक्षा नियंत्रक भारद्वाज संयम यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. दरम्यान आता आपण सीबीएसई बोर्डाने मान्यता दिलेला हा नियम नेमका कसा आहे, याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार, तसेच पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील दहावीच्या परीक्षा कधी होणार? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
CBSE बोर्डाच्या उन्हाळी सुट्ट्या नऊ जून रोजी समाप्त झाल्यात आणि त्यानंतर शाळा सुरु झाली. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा १६ जून पासून सुरु झाल्या आहेत. असे असताना यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२५ मध्ये दहावीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे.

सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जाणार आहेत. मात्र याच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा मे महिन्यात घेतल्या जातील. तसेच पहिल्या टप्प्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल साधारणता एप्रिल महिन्यात जाहीर केला जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्यात जाहीर केला जाणार आहे.
तसेच, दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य असणार आहे तर दुसरा टप्पा पर्यायी असणार अशी माहिती बोर्डाकडून यावेळी देण्यात आली आहे. याशिवाय सीबीएई बोर्डाने हे देखील स्पष्ट केले आहे की जे इंटरनल असेसमेंट आहे ते फक्त एकदाच घेतले जाईल. म्हणजे दहावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फक्त दोनदा होणार आहेत इंटरनल असेसमेंट दोन्ही टप्प्यासाठी एकच राहणार आहे. सीबीएसईने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या निर्णयानंतर आता सीबीएसई दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याचे गुण पहिल्या टप्प्यात कमी असतील तर त्याला दुसऱ्या टप्प्यात बसून आपले गुण सुधारता येणार आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी सीबीएसई कडून यावर्षीपासून एक चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे असे आपण म्हणू शकतो.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

